Search with business name or city

वरदायिनी गोमाता ऍग्रो प्रोडूसर कंपनी लि. वेदांता गोशाळा, पेट्री अंबानी बस स्टॉप जवळ, सातारा कास पठार रोड, सातारा.

🐄🐮📲8830044132 📲9322485142,

वरदायिनी गोमाता ऍग्रो प्रोडूसर कंपनी लि. वेदांता गोशाळा, पेट्री अंबानी बस स्टॉप जवळ, सातारा कास पठार रोड, सातारा.

गो सेवेतून समृद्धी.


चंद्रभागा चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वेदांता गोशाळेची स्थापना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शैलेंद्र सावंत यांनी 2015 साली आपल्या 11 गोसेवक सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे धर्मादाय येथे केली. जरी संस्थेची स्थापना 2015 झाली असली तरी श्री शैलेंद्र सावंत हे 2000 सालीच आधुनिक भारताचे महान संत श्री स्वर्गीय राजीव भाई दीक्षित यांच्या संपर्काने प्रभावित होऊन ठाणे जिल्ह्यातील वाडा, मोखाडा सारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये कार्यरत झाले होते. श्री राजीव भाई यांच्यासोबत काम करत असताना गाय जगली तर गावात राहणारे कुटुंब जगू शकते या विचाराने प्रेरित होऊन मुंबई येथील आपले कार्पोरेट सेक्टर मधील करियर सोडून पूर्णवेळ गो सेवेमध्ये येण्याचा निर्णय घेतला. पुढे 2005 साली विवाहानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी ज्या सॉफ्टवेअर क्षेत्रातून होत्या त्यांनीही त्यांना साथ देऊन त्यादेखील आता पूर्ण वेळ गो सेवेचेच काम करतात. आतापर्यंत श्री शैलेंद्र सावंत यांनी मुंबई,सातारा,पुणे अशा अनेक ठिकाणी गोरक्षनाच्या कारवायात सक्रिय सहभागी होऊन हजारो गाई वाचविल्या आहेत. परंतु नुसते गोरक्षण करून हा प्रश्न सुटणार नाही तर गोरक्षण केलेल्या गाईंचे संगोपन संवर्धन करणे देखील तितकेच गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर 2015 साली एका सामाजिक शैक्षणिक ट्रस्टची स्थापना करून स्वतःची गोशाळा उभी केली व इतर गोरक्षकांना देखील गोशाळा काढण्या संदर्भात मार्गदर्शन केले. गोरक्षनाथ आलेल्या गाई सक्षम गोशाळां व गरजू शेतकऱ्यांना संभाळण्यासाठी दिल्या जातात. आज संस्थेकडे असलेल्या सातारा कास रोड पेट्री येथील गोशाळेवर 21 गायी असतात. गो शाळेवर एक कामगार जोडी कायम असते व वेळेनुरूप इतर कामगारांना रोजगार दिला जातो. गोशाळा स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या पायांवर उभी करण्यासाठी गो शाळेवर पंचगव्य वस्तूंची निर्मिती केली जाते. या वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण संस्थेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी घेतलेले आहे. पंचगव्य वस्तूंमध्ये प्रामुख्याने जळणारे दिवे, यज्ञकर्मासाठी लागणाऱ्या शेणी, धूप,गोमूत्र अर्क व इतर अनेक पंचगव्यापासून बनणाऱ्या वस्तू बनवल्या जातात. गो शाळेवर बनणाऱ्या वस्तूंची सुरळीत रूपाने बाजारात विक्री व्हावी याकरिता संस्थेच्याच मार्गदर्शनाखाली वरदायिनी गोमाता ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड स्थापना देखील झालेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक युवतींना या वस्तू विक्रीतून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्राहकांना नियमित पूजे करिता, कोणतीही हानिकारक केमिकल न वापरता सात्विक पूजा साहित्य उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सुरुवातीला गोशाळेला भांडवल उभे करण्यासाठी वार्षिक सभासद योजने मधून कंपनी कार्यरत झालेली आहे आर्थिक घडी बसल्यावर रिटेल, किरकोळ स्वरूपात देखील विक्री उपलब्ध करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. यावर्षीच्या गोशाळेवर वसुबारस या दिवशी झालेल्या यज्ञा समोर गो शाळेवरील तसेच गोरक्षण केलेल्या 1000 गाईंना दत्तक देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेंद्र सावंत यांनी संकल्प घेतला आहे.